रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.५० वा. सुमारास करण्यात आली. संतोष शंकर भाटकर (५२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल प्रशांत पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित हा विना परवाना आपल्या ताब्यात ९५० रुपयांची ९ लिटर गावठी हातभट्टीची दारु बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:57 AM 18/Jan/2025














