संगमेश्वर : आरवलीत सर्व्हिस रस्ता बांधकामासाठी २६ जानेवारीला होणार आंदोलन

देवरुख : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ चे काम सध्या सुरु आहे. मौजे आरवली येथे या महामार्गाला करजुवे कुंभारखाणी हा रस्ता छेदून जात असल्यामुळे त्या वाहतुकीसाठी अंडरपास रस्ता व सर्व्हिस रस्ता बांधण्यात आला आहे. येथील सर्व्हिस रोडच्या पक्क्या बांधकामासाठी २६ रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हा सर्व्हिस रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे. याची दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ प्रजासत्ताक दिनी करणार आंदोलन करणार आहेत. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत व मोठ्या आकाराची खडी वर आली आहे. यामुळे या रस्त्यावरुन वाहतुक करताना अपघात होत आहेत. गाडीच्या टायरखाली खडी आल्यामुळे ती उडवली जात आहे. तसेच प्रचंड अशी धूळ उडत आहे. त्यामुळे या भागात वावरत असलेले नागरिक तसेच व्यापारी त्रस्त झाले आहेत. सर्व्हिस रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात यावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. लोकहिताचा विचार करता २६ जानेवारी रोजी ठेकेदाराविरुध्द आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 18/Jan/2025