मार्गताम्हाणेत २ फेब्रुवारी रोजी चिपळूण, गुहागर तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा

रामपूर : मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, वसंतराव भागवत माध्यमिक व कै. सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय, सेमी इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा यांच्यावतीने २ फेब्रुवारी रोजी देवी पद्मावती विद्या संकुल मार्गताम्हाणे (ता. चिपळूण) येथे सकाळी ८ वा. चिपळूण आणि गुहागर तालुका मर्यादित तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धा ही वैशिष्ट्यपूर्ण असून ‘देश समर्पित भावना व आरोग्यम् धनसंपदा’ या तत्त्वावर आधारलेली आहे. या स्पर्धेसाठी १० वर्षांखालील गटासाठी दोन किलोमीटर अंतर मर्यादा असून यासाठी ३ हजार, २ हजार व एक हजार रूपये. तसेच १४ वर्षाखालील गटासाठी पाच किलोमीटर अंतर असून यासाठी ४ हजार, ३ हजार, २ हजार रूपये, १८ वर्षांखालील गटासाठी
किलोमीटर अंतर मर्यादा असून ५ हजार रूपये, ३ हजार, २ हजार रूपये असे पारितोषिक आहे. तसेच १८ वर्षांवरील खुल्या गटासाठी अंतर मर्यादा १० किलोमीटर असून बक्षीसे अनुक्रमे ५ हजार रू., ३ हजार रू., २ हजार रू. असे रोख पारितोषिक असून सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक व प्रशस्तीपत्रक तसेच सहभागींनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व माजी आ. मधुकर चव्हाण, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांनी केले आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभाग नोंदविण्यासाठी मॅरेथॉन कमिटीचे प्रा. डॉ. सत्येंद्र राजे, राकेश खांडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 18/Jan/2025