रत्नागिरी : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://maharashtrainternat ional.com/job.aspx अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपूण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंग सह) असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या या मिडवाइफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय देखरेखीखाली अधिकाऱ्यांच्या किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण, जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 18/Jan/2025














