चिपळुणात १२ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : येथील पूज्य गांधी प्रतिष्ठानच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी गांधारेश्वर येथे विद्यार्थ्यांसाठी महात्मा गांधीजी यांच्या जीवनावर तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधीजींच्या हत्येनंतर त्यांचा अस्थीकलश कै. शांताराम तांबट व अन्य स्वातंत्र्यविरांनी १२ फेब्रुवारी १९४८ मध्ये चिपळुणात आणला. तेव्हापासून येथे गांधीजींचे पुण्यस्मरण केले जाते. गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष कै. रघुवीर भास्कर तथा तात्यासाहेब कोवळे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. इ. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा होईल. पहिल्या गटासाठी गांधीजींच्या जीवनावरील प्रसंग व स्वच्छता अभियान यावर चित्र काढायचे आहे. दुसऱ्या गटासाठी गांधीजींचे व्यक्तिचित्र आणि गांधीजींची स्मारके हे विषय आहेत. विजेत्यांना रोख बक्षीस मिळणार आहे. स्पर्धेसाठी ९ ते ११ ही वेळ असेल. विद्यार्थ्यांना कागद देण्यात येईल. या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. विनायक व सदस्यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 18/Jan/2025