मानाच्या पत्रकार चषक क्रिकेट सामन्यात ‘खबरदार फायटर्स’ विजयी

◼️ संघ मालक हेमंत वणजु यांनी टिम मधील खेळाडूंचे केले अभिनंदन

रत्नागिरी : पत्रकारांचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरू असून यात पत्रकार क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांमध्ये तीन संघामध्ये थेट लढत झाली. अंतिम सामना खबरदार फायटर्स विरुद्ध नाईन पॉप्युलर संघांमध्ये झाला. अतिशय रोमहर्षक अशा लढतीत खबरदार फायटर्स संघाने एका धावेने विजय मिळवत मानाचा पत्रकार चषक पटकावला.

शनिवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इनडोअर स्टेडियम (टर्फ) येथे या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. खबरदार फायटर्स, नाईन पॉप्युलर आणि एक्स्प्रेस फायटर्स हे संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. खबरदार फायटर्स, नाईन पॉप्युलर या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना खबरदार फायटर्स संघाने चार षटकात ३१ धावा केल्या. नाईन पॉप्युलर संघ ३० धावा करू शकला. अंतिम सामन्यात खबरदार फायटर्स संघ एका धावेने विजयी झाला. खबरदार संघाचे मुख्य व्यवस्थापक हेमंत वणजू यांनी संघाला मोलाचे मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:41 18-01-2025