रत्नागिरी : कर्ला-खाडीत खेकडे पकडणाऱ्याला प्रौढाला मारहाण

रत्नागिरी : शहराजवळील कर्ला-खाडी येथे खेकडे पकडणाऱ्या प्रौढाला अनोळखी व्यक्तीने मारहाण केली. त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मिर्झा अलिमिया मिरकर (वय ५०, रा. कर्ता, रत्नागिरी) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १८) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरकर हे कर्ला येथील खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी मासेमारी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या डोळ्यावर हाताच्या ठोशाने मारुन दुखापत केली. त्यांच्या डोळ्याला मार लागला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 20/Jan/2025

Gadre3