चिपळूण : टेरव-अडरे गावच्या सीमेवरील कोळसाभट्टीवर ‘वन विभागाची’ कारवाई

चिपळूण : टेरव अडरे गावच्या सीमेवर आढळून आलेली कोळसाभट्टी उद्ध्वस्त करून कोळसा जप्त केला आहे. ही कारवाई विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वन विभागाच्या पथकाने केली.

टेरव येथे गेल्या काही महिन्यात कोळसा भट्ट्यांवर येथील वन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. काहींवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. रविवारी केलेल्या कारवाईत संतोष राजाराम कदम (रा. टेरव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 20/Jan/2025

Baguass