काळबादेवी येथे घरासमोरील जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : कोणतीही परवानगी न घेता दुसऱ्याच्या जागेत पर्ससिन नेटवे जाळे ठेवून जागेत अतिक्रमण करणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दिलीप शंकर जोशी (रा. जोशीवाडी-काळबादेवी, सध्याः उद्यमनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २८ नोव्हेंबर ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत काळबादेवी येथे निदर्शनास आली.

फिर्यादी गणेश जयदेव जोशी (रा. जोशीवाडी, काळबादेवी, रत्नागिरी, सध्या तुलीप को. ऑप. हाऊसिंग सोसायटी धनसोली, नवी मुंबई) व त्यांचा भाऊ रोशन प्रभाकर जोशी असे कुटुंबासह मुंबई येथून २८ नोव्हेंबरला गावी काळबादेवी येथे आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या समोर गावातील संशयित दिलीप जोशी यांनी स्वतःच्या मालकीचे मासेमारीचे पर्ससिनचे जाळे ठेवलेले दिसले. त्यामुळे फिर्यादी यांना वावरण्यास अडथळा झाला. संशयिताने जमिनीवर एक प्रकारे अतिक्रमण केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 20/Jan/2025

Shanti 3