दापोली : वावघर गुरववाडी ते बलेकरवाडीत कोसळलेल्या विद्युतवाहिनीकडे महावितरणचे दुर्लक्ष

दापोली : वावघर गुरववाडी ते वावघर बलेकरवाडी येथे कोसळलेल्या विजेच्या खांबावरील विद्युतवाहिनीतून वीज प्रवाहित होत असल्याचे महावितरणाच अधिकाऱ्यांना वारंवार सांगण्यात आहे होते. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. हा नियमित रह‌दारीचा रस्ता असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

गुरववाडी ते वावघर बलेकरवाडी दरम्यान ११ केव्ही वीजपुरवठा होणाऱ्या विद्युतवाहिनीवरील विजेचे खांब कोसळल्याने विद्युतवाहिनी तुटली आहे. त्यामधून विद्युत पुरवठा सुरूच आहे. त्यामुळे पायवाटेने जाणारे ग्रामस्थ तसेच जनावरे यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. ही बाब गुरव वाडीतील ग्रामस्थ व शिवसेना उन्हवरे गट संघटक महेंद्र महाडिक यांनी लाईनमनच्या निदर्शनास आणून दिली होती, मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता तिकडे दुर्लक्ष केले आहे. तेथील खांब हे लोखंडी असून गंजलेले आहेत. तेही खांब त्वरित बदलणे आवश्यक आहे, असे महाडिक यांचे मत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि विद्युतवहिनी तात्काळ व्यवस्थित करावी अशी मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 20/Jan/2025