खेड : लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी

माखजन : खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे येथे कुटुंब कल्याण शिबीर यशस्वी करण्यात आले. या शिबिरात २२ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे शिबिर खेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. पी. गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. २२ शस्त्रक्रियांपैकी प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे यांच्यातर्फे सर्वाधिक १३ शस्त्रक्रिया झाल्या तर प्राथमिक आरोग्य केंद्र वावे ३, प्राथमिक आरोग्य केंद्र शिव २, प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूस २ प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव १ प्राथमिक आरोग्य केंद्र तिसंगी १ अशा एकूण २२ शस्त्रक्रिया झाल्या. या शिबिरादरम्यान, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, आशा सेविका, आरोग्य विस्तार अधिकारी सफाई कामगार, वाहन चालक आदींचे योगदान लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 20/Jan/2025