मंडणगड : येथील दिवाणी न्यायालयाच्या पूर्णत्वास जात असलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम व अन्य सुविधा यांची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, मुख्य न्याय दंडाधिकारी, रत्नागिरी निखिल गोसावी यांनी 18 जानेवारी रोजी मंडणगड येथे भेट दिली. येत्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत न्यायालायाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्या नंतर या इमारतीचे लोकार्पण करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या भेटीनंतर येथे दिली.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकार्यांसह पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक विजय चव्हाण, श्री. धाडगावकर, प्रांताधिकारी अर्चना बोंबे, तहसीलदार अक्षय ढाकणे, अधीक्षक अभियंता मिलींद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमरदीप रामसे आदी अधिकारी उपस्थित होते.
मंडणगडमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी प्रथमच दिवाणी न्यायालय सुरु करण्यात आले. याचवेळीच दिवाणी न्यायालयासाठी स्वतंत्र व सुसज्य अशी स्वमालकीची इमारत असावी, यासाठी जागेची उपलब्धता करून न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले होते. हे दोन्ही कार्यक्रम सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश भूषण गवई व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले होते. त्या नंतर मंजूर असलेल्या न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या न्यायालयाची नवीन प्रशस्त इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. आज मंडणगड भेटीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी इमारतीसंदर्भात प्रथम अधिकार्यांकडून इमारतीच्या बंधकामासंदर्भात आढावा घेतला व त्यानंतर सर्व अधिकार्यांच्या समवेत प्रत्यक्ष न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित सबंधित अधिकार्यांना उपस्थितीत इमारत व सुविधांसंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या.
या पाहणी नंतर माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह म्हणाले की, 15 ऑगस्ट 2025 पर्यंत न्यायालायाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या इमारतीचे लोकार्पण करण्याचा विचार करण्यात येईल.
यावेळी मंडणगड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे, उपाध्यक्ष अॅड. सचिन बेर्डे, नायब तहसीलदार संजय गुरव, नायब तहसीलदार सुदर्शन खानविलकर, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, मंडल अधिकारी नीलेश गोडघासे, प्रकाश साळवी, गटविकास अधिकारी विशाल जाधव, नगर पंचायत मुख्याधिकारी अभिजित कुंभार, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एम. बी. वास्ते, अभियंता माधव कोंडविलकर, अभियंता किरण कुळधर आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 20-01-2025














