इस्रो व नासा अभ्यास दौऱ्यासाठी दापोलीतील ८ विद्यार्थ्यांची निवड

जालगाव : इस्रो तसेच नासा या अंतराळ संशोधक क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या अभ्यास दौऱ्यासाठी दापोली तालुक्यातून ८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जि. प. रत्नागिरीचा हा स्वप्नवत उपक्रम असून गत तीन वर्षापासून ग्रामीण भागातील जि.प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना रत्नागिरी जि.प. मार्फत इस्त्रो नासा अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जात आहे.

नुकत्याच झालेल्या चाचणी परीक्षा, मुलाखत आणि प्रात्यक्षिकातून दापोली तालुक्यातील दोन नासा तर पाच विद्यार्थ्यांची या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. इस्त्रो- नासा अभ्यास दौरा म्हणजे जि. प. रत्नागिरीचा ग्रामीण भागातील सामान्य कुटूंबातील असामान्य मुलांसाठी स्वप्नवत असल्याचे दापोलीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी शिक्षण विभाग दापोली मार्फत या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी दापोलीत मत व्यक्त केले.

तालुक्यापासून सुमारे ३५ कि. मी. अंतरावर दुर्गम खोऱ्यात वसलेल्या आदर्श गाव विरसई येथील जि. प. शाळेतील तब्बल तीन विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. विरसईसह, कुडावळे नं. १, जोगेळे नं. १, हर्णे तसेच जि.प. शाळा मळे या शाळेतील पुढील विद्याथ्यांची निवड झाली असून त्यांचे अभिनंदन होत आहे.

जान्हवी राजेंद्र तांबुटकर बिरसई व अंशुल विक्रांत पाटील कुडावळे नं. १ यांची नासा तर विनित विनय राणे, अथर्व गणेश तांबीटकर दोघे विरसई, सृष्टी संतोष चौधरी- हर्णे, आयुष मुकेश पांदे-मळे, आणि हर्ष अमोल कांबळे- जोगेळे नं. १ हे पाच विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी दापोली तालुक्यातून निवडले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना विरसईचे संदीप भेकत, विनय राणे, मुरलीधर शिरसाठ, कविता भोये, कुडावळेच्या कविता कोराणे, गणेश चव्हाण, अश्विनी मोरे, शिवाजी जाधव जोगेळेच्या आशाराणी राठोड, मानसी जालगावकर, योगेश्वरी सोंडकर, स्वप्ना आयरे, हर्णेच्या निलीमा धोपावकर, कांचन जाधव, मळेच्या दिनेश चिपटे, रश्मी पेवेकर आदी शिक्षक, केंद्रप्रमुख धनंजय सिरसाट, सुनिल कारखेले, प्रवीण काटकर, दिनकर क्षिरसागर, विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, बळीराम राठोड, रामचंद्र सांगडे यांचे मार्गदर्शन तर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांची प्रेरणा लाभली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 20/Jan/2025