रत्नागिरी : तंत्रस्नेही योगेश नाचणकर यांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान

रत्नागिरी : राज्यस्तरीय शैक्षिणक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यायालयाचे तंत्रस्नेही शिक्षक योगेश नाचणकर यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे तालुका व जिल्हास्तरावर विविध गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या नूतन शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमात योगेश नाचणकर यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य सुशील शिवलकर, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, माजी नगरसेवक राजन शेट्ये, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, माजी प्राचार्य भागवत उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 21/Jan/2025