रत्नागिरी : चिंचखरीतील जेटीला मोठ्या भेगा

रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वरजवळील चिंचखरी गावातील खाडीकिनारी बांधलेल्या जेटीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. खारफुटी बंधाऱ्याला लागून ही जेटी असून, या ठिकाणी छोट्या होडया लागतात. येथून काही प्रमाणात वाहतूक केली जाते. या जेटीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कर्ला, जुवे येथून चिंचखरीत जाण्याकरिता या जेटीचा उपयोग केला जातो. स्थानिक मच्छीमार मंडळीही आपल्या होड्या येथे लावतात. येथून आत जाताना असणाऱ्या जेटीची दुरुस्ती करण्याची मागणी मच्छीमार, ग्रामस्थांनी केली आहे. याच भागात बोटिंग आणि होडीतून पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे येथे छोट्या होडया, मच्छीमारांच्या होडयांची ये-जा असते. त्यामुळे हा रस्ता व जेटीच्या सुरक्षेसाठी दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी सागर महोत्सवाअंतर्गत येथे कांदळवन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. कर्ला येथून या सहलीला होडीतून सुरुवात झाली. त्यानंतर चिंचखरी किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर येथील जेटीला पडलेले खड्डे व एका बाजूने बांध कोसळल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पर्यटक व स्थानिक रहिवाशांनी या जेटीची दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 21/Jan/2025