राजापूर : गावपडवे गावातील शेतकरी ग्रामस्थ अनिल गणपत भोसले यांचा उमदा बैल बिबट्याने हल्ला करून ठार मारला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजापूर तालुक्यातील ग्रा. प. पडवे कार्यधेत्रातील गावपडवे गावातील शेतकरी ग्रामस्थ अनिल गणपत भोसले यांचा उमदा साडेतीन वर्षाचा बैल १९ जानेवारी २०२५ रोजी पहाटे बिबट्याने झडप टाकून ठार केला. हा बैल गावातील समशान जवळ मारला. यामुळे अनिल भोसले यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित सरकारी यंत्रणेने पंचनामा केला असून, नुकसान भरपाई लवकरच मिळावी, अशी मागणी पडवे परिसरातून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 21/Jan/2025














