राजापूर : नूतन विद्यामंदिरात वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रबोधन कार्यक्रम

राजापूर : नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणी व बॅरिस्टर नाथ पै ग्रंथालय ओणी यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताह मार्गदर्शन व प्रबोधन कार्यक्रम पार पडला.

यावेळी रस्ता सुरक्षा व अपघाताचे वाढते प्रमाण, अठरा वर्षांखालील मुलांना गाडी चालवण्यास निर्बंध ड्रिंक अँड ड्राईव्ह तसेच विनापरवाना लायसन्स गाडी चालवणे, सिट बेल्टचा वापर न करणे, विनाकागदपत्र गाडी चालवणे याविषयीचे मार्गदर्शन प्रादेशिक परिवहन कार्यालयचे अधिकारी सुशांत पाटील यांनी आर. एस. पी. विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी देखील वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै ग्रंथालयाचे अध्यक्ष व ओणी संस्थेचे कार्यवाह अॅड, गुरदत्त खानविलकर यांनी केले.

यावेळी रत्नागिरी एसटीचे अधिकारी रमेश कोकरे व अरुण लाड, प्रशालेतील आर एस पी विषयाचे जिल्हा समादेशक श्री पुंडलिक वाजंत्री व प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सुनील कोंडकर पर्यवेक्षक विनोद मिरगुले, ग्रंथालय कर्मचारी, प्रशालेतील आर. एस. पी. विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले व आभार वसंत झोरे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 21/Jan/2025