रत्नागिरी : मॅजिक स्क्वेअरच्या चार बुद्धिबळपटूंना फिडे मानांकन

रत्नागिरी : येथील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीच्या प्रत्यक्ष पटावरील व ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या चार बुद्धिबळपटूंनी मागील काही कालावधीत उल्लेखनीय कामगिरी पार पाडत बुद्धिबळातील फिडे मानांकनाला गवसणी घातली.

राजस विजयकुमार मुळ्ये याने पुणे येथे झालेल्या जेकेज इसिए जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा व श्री. महेश्वरानंद सरस्वती स्मृती अखिल भारतीय स्पर्धा अशा दोन स्पर्धांत सहभागी होत एकूण चार फिडे मानांकित खेळाडूंविरुद्ध विजय प्राप्त केला. कणकवलीच्या यश देवू पवार याने गोव्यात झालेल्या कै. चंद्रकांत नाईक स्मृती तसेच कै. गोपाळ सुखटणकर स्मृती या दोन अखिल भारतीय जलद बुद्धिबळ स्पर्धांत चांगली कामगिरी पाडीत १५११ इतके जलद फिडे मानांकन प्राप्त केले. जीजीपीएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणारी सई प्रभुदेसाई हिने पुणे येथे झालेल्या श्री महेश्वरानंद सरस्वती स्मृती खुल्या जलद फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत १४६४ जलद फिडे मानांकन प्राप्त केले. निधी मुळ्ये हिने देखील मागील वर्षात उल्लेखनीय कामगिरी नोंदवीत क्लासिकल बुद्धिबळ प्रकारात १४६३ फिडे गुणांकन प्राप्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 21/Jan/2025