भारतीय नात्यांमधील प्रेम भारावून टाकणारे : ऑलिव्हर मर्चंड

सावर्डे : भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसाच तो भावना प्रधानही आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आत्मिक बल वाढवण्याचे काम फक्त भारतीय संस्कृतीतच आढळते. हे मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त आहे. भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे, हे ऐकले होते, ते आता प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहायला मिळाले याच्यात आनंद आहे. भारतात जयंती, पुण्यतिथी साजरी करतात आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात, ही नाविन्यता आपण पहिल्यांदा पाहतोय, असे गौरवद्‌गार ऑस्ट्रेलियन पाहुणे ऑलिव्हर मर्चडे यांनी काढले.

देशातील वातावरण कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. येथील तरुणांनी व्यवसायामध्ये पदार्पण करून जास्तीत जास्त विकास साधावा, असे आवाहन मर्चडे यांनी युवकांना केले.

स्व. गोविंदरावजी निकम यांच्या ९० व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित विद्यार्थी सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्ट्रेलियाचे ऑलिव्हर मचंड उपस्थित होते. यावेळी विचार मंचावर आ. व संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संचालक शांताराम खानविलकर, मानसिंग महाडिक, सचिव महेश महाडिक, उद्योजक प्रदीप निकम, प्रशांत निकम, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, पालक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

५ व्या वर्षी मोटोक्रोस, १६ व्या वर्षी टोकास शर्यतीची सुरुवात करणारे, एनएसडब्ल्यू राज्याच्या अंतर्गत १६ श्रेणीत टॉप तीनमध्ये स्थान मिळवून यश प्राप्त करणारे, ऑस्ट्रेलियाभर स्पर्धा करत ४० हजार कि.मी. वार्षिक प्रवास करून ऑस्ट्रेलियातील टॉप १० मोटोक्रोस रेसर्समध्ये सातत्याने स्थान मिळवून, कृषी व्यवसायातील डिप्लोमा पूर्ण करून ते क्वीन्सलँण्ड विद्यापीठातून कृषी आणि कृषी व्यवासाय पदवीच्या शेवटच्या वर्षात मर्चडे शिक्षण घेत आहेत. ऑस्ट्रेलिया येथील कौटुंबिक व्यवसायातील करार व्यवस्थापनात सक्रीय सहभाग व ६५ हजार हेक्टरवर यंत्रसामग्री ऑपरेशन्सची देखरेख करून त्याचवेळी विविध पिकांची लागवड करून ३०० हेक्टर शेतीचे व्यवस्थापन करणारे ए. जी. मचंड सर्व्हिसेस न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाचे सहसंचालक ऑलिव्हर मर्चंड यांनी आपले अनुभव याप्रसंगी युवकांच्या समोर कथन केले. हे अनुभव भारतीय युवकांसाठी प्रेरणादायी आहेत.

Infigo Eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 21/Jan/2025