रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री व पुरुष यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील अनेक लोकांनी यामध्ये सहभाग घेतला.
नेत्रतपासणीचा लाभ शंभराहून अधिक महिलांनी घेतला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवले जाणारे सर्व उपक्रम नागरिकांना लाभदायक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेले काम रत्नागिरी भाजपाच्या माध्यमातून होत असल्याचे ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते मामा राणे यांनी सांगितले आणि भाजपा पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 21-01-2025












