चिपळूण : यापुढे जन्माला येणारी पिढी ही टेक्नोलॉजी आत्मसात करणारी असेल. जगभरातील माहिती ते एका क्लिकवर मिळवतील. असे शिक्षण घेण्यासाठी ही पिढी उत्सुक असेल. या पिढीला शिक्षण देताना शिक्षकांना त्यांच्या कक्षा विस्ताराव्या लागतील, असे मत अभिनेते, लेखक दीपक करंजीकर यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जिल्ह्यातील ३४ विद्यार्थ्यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंदाच्या सभागृहात रविवारी चतुरंग प्रतिष्ठान यांच्यावतीने हा कार्यक्रम झाला. ते म्हणाले की, मुलाच्या ताटात काय वाढायचे, यांची आई जेवढी काळजी घेते, तेवढीच विद्यार्थ्यांच्या बौध्दिक भुकेसाठी काय द्यायचे, यांची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात वाटचाल करत असताना त्यांनी त्यांच्या निवडलेल्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना मार्गदर्शन म्हणून योग्य माणूस भेटला की, त्यांच्या जीवनाची यशाच्या दिशेने जातील. आपण कुठे आहोत आणि काय करण्याची गरज आहे त्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे, याचे कोटेकार पालन केले पाहिजे. सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार पाप्त विद्यार्थी नक्कीच पद्मश्री पुरस्कार घेतील. या विद्यार्थ्यांमध्ये क्षमता दिसते आणि ती क्षमता त्यांना चतुरंगमुळे मिळाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले यांनी देखील विचार मांडले. तसेच पोलिस हेड कॉन्स्टेबल रमा करमरकर याही उपस्थित होत्या.
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराचे मानकरी…
हर्षवर्धन भिंगे (दाभोळकर स्कूल, भूमी कोलगे (आगवेकर विद्यालय), आर्या नांदिवडेकर (निकम विद्यालय), माही मयेकर (तळवली स्कूल), ओम नाटेकर (वैद्य विद्यालय), साक्षी कोरे (गांधी विद्यालय), श्रेयशा नरळे (पाटपन्हाळे स्कूल), श्रेया पवार (डॉ. आंबेडकर हायस्कूल), यज्ञा कदम (चितळे स्कूल), तन्मय पाटील (लांजा स्कूल), वेदांग कुलापकर (पटवर्धन हायस्कूल), निरजा पोळ (कबनुरकर स्कूल,), भक्ती गायकवाड (सदुरू काडसिद्धेश्वर विद्यालय), निलांबरी ठाकूर (श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट स्कूल), आर्या कुंभार (फाटक हायस्कूल), मानसी दळवी (चंदुलाल शेठ हायस्कूल), आर्या बापट (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी-चिंचघरी), स्वरा विखारे (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), मिहिर कोपकर (ए. जी. हायस्कूल), यज्ञा परांजपे (ठाकरे विद्यालय), स्वरा जोशी (पालशेतकर विद्यालय), अरजिना सलाम शेठ (कसबा स्कूल), तन्वी मोरे (बाईत विद्यालय), श्रद्धा निकम (पूज्य साने गुरूजी विद्यामंदिर), यज्ञा थरवळ (पाध्ये स्कूल), सानवी केळकर (बळीराम परकर विद्यालय), वेदांत लिंगायत (सुर्वे माध्य. विद्यालय), अमर कोणसी (ढेरे माध्य. विद्यालय), भूमी पवार (श्रीसिद्धीविनायक विद्यामंदिर), निशाद आकुर्डे (रा. भा. शिर्के), दुर्वा पडवळ (आर. सी. काळे विद्यालय), मयूर घोरपडे (पाग स्कूल), अपूर्व बुरटे (एसपीएम, चिपळूण), ऋषिकेश लेले (सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल).
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 21/Jan/2025














