गुहागर : गुहागर येथे महापुरुष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत विघाता संघ असगोली यांनी विजेतेपद तर महापुरुष संघ गुहागरने उपविजेतेपद पटकावले. गुहागर येथील पोलिस परेड मैदानात ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्या विघाता संघाला रोख १५ हजार रूपये व चषक, उपविजेत्या महापुरुष संघाला १० हजार रूपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून विधाता संघाचा कुंदन रोहिलंकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून महापुरुष संघाचा राकेश राऊत, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपेश गावडे तर मालिकावीर म्हणून विधाता संघाचा कुंदन रोहिलकर हा ठरला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 21/Jan/2025














