रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात; एका व्याजी पैशांच्या व्यवहारात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात तक्रारदार श्री संदिप मधुकर वेलोंडे व संशयित आरोपी निलेश किर आणि अॅड. महेश नलावडे यांचा समावेश आहे.
तक्रार दाराने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा रत्नागिरी शहरात 15 मार्च 2017 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत झाला. तक्रारदाराने आरोपी निलेश किर याला व्याजी पैशाच्या व्यवहारात दोन कोरे चेक दिले होते, परंतु रक्कम परतफेड करूनदेखील ते चेक परत मिळाले नाहीत. या व्यतिरिक्त, तक्रारदार संदीप वेलोंडे यांचे गावातील सुभाष किसन गराठे व निलेश कीर यांच्या व्यवहारात तक्रारदार यांनी मध्यस्थी केली होती. या व्यवहारात ठरल्याप्रमाणे निलेश कीर याला पैसे परत न मिळाल्याने त्याने सुभाष गराठे यांची ओरी गावातील २५ एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली. तरीदेखील तू सुभाष गराठे च्या व्यवहारात मध्यस्थी होतास, आता मला जमीन नको, तुझ्यामुळे मला तोटा झाला, आता तूच माझी जमीन घे असा तगादा निलेश कीर याने लावला. तसेच तुझे कोरे चेक वापरून तुझी वाट लावतो अशा धमक्या देऊ लागला. म्हणून अखेर तक्रारदाराने हि जमीन विकत घ्यायचे ठरवले.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे कि व्याजी रक्कमेच्या व्यवहारा मधुन निलेश किर याने खरेदी केलेली आमचे ओरी गावातील सर्वे नं. 129 हिस्सा नं. 14/2, 226-1/2, 227-3/2, 229-4/17/2 अशी एकुण सुमारे 25 एकर मी खरेदी करण्याचे ठरवले. यानुसार जमिनीचे खरेदी खाताचे व्यवहारा करीता मला अॅड महेश नलावडे यांच्या ऑफिसमध्ये बोलावुन तेथे सदर जमिनीचे मुळ खरेदी खत करुन त्यावर माझ्या व साक्षीदारांच्या सह्या घेतल्या. यावेळी जमिनीच्या व्यवहरापोठी ठरलेली रक्कम रुपये 22,72,000/-रु अॅड. महेश नलावडे यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या व साक्षीदार श्रीकृष्ण देवरुखकर यांच्या समक्ष निलेश किर याने स्वतःच्या ताब्यात घेतली. सदर रक्कम मी घरी ठेवुन खरेदी खत रजिस्टर करण्यार करीता रजिस्टर कार्यालय रत्नागिरी येथे येतो असे सांगुन निलेश कीर तेथून निघून गेला. त्यानंतर विनंती करूनही त्याने खरेदीखत करून जमीन विक्रीचा व्यवहार पूर्ण केला नाही. सदर रजिस्टर न झालेले खरेदीखत अॅड महेश नलावडे यांनी मला विश्वास देवुन त्यांच्या ताब्यात ठेवले. मुळ खरेदी खत त्यांच्याकडुन घेवुन जावुन माझी निलेश कीर याने रक्कम रुपये 22,72,000/-रु ची फसवणुक केलेली आहे. सदर फसवणुकी मध्ये अॅड महेश नलावडे यांनी मला व साक्षीदार असणारे श्रीकृष्ण देवरुखकर यांना विश्वास देवुन स्वतःचे ताब्यात ठेवलेले मुळ खरेदी खत आमचे परवानगी शिवाय निलेश किर यांना देवुन माझा विश्वासघात व फसवणुक केलेली आहे म्हणुन माझी निलेश किर व अॅड महेश नलावडे यांच्या विरोधात तक्रार आहे असे पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदाराने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकारी श्याम उत्तम अरामलकर यांना तपासाचे काम सोपवण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 318(4), 308(3), 3(5) आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 कलम 44 आणि 3(a) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.














