गुहागर : तालुक्यातील पिग्मी संकलन करणाऱ्या एका विवाहितेला अश्लील भाषेत बोलत, धमकी दिल्याप्रकरणी उमेश प्रभाकर शिंदे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. संशयित उमेश शिंदे याने त्या विवाहितेला शिवीगाळ केली. माझ्याशी फोनवर बोल, अन्यथा घरी येऊन राडा करेन अशीही धमकी दिली. त्याचबरोबर त्या पिग्मी संकलनाला गेल्यावर पाठलाग करत असे. या प्रकाराला कंटाळून अखेर विवाहितेने हा प्रकार घरच्यांना सांगितला. १९ जानेवारीला याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास मुरा पोलिस अमंलदार लुकमान तडवी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 22/Jan/2025














