खेड : चूल पेटविताना वृद्धा भाजली

खेड : चूल पेटवताना बाजूच्या रॉकेलच्या कॅनला धक्का बसून भडका उडाल्यामुळे वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे दाखल केले आहे. लक्ष्मीबाई जनार्दन झोरे (६९, रा. खोपी कुपरेवाडी, खेड) असे भाजलेल्या वृद्धेचे नाव आहे.

ही घटना रविवारी (ता. १९) सकाळी घडली. त्या घरी एकट्याच असताना त्यांनी चूल पेटवली होती. त्यावेळी चुलीच्या बाजूलाच असलेल्या रॉकेलच्या कॅनला त्यांचा धक्का लागला. रॉकेल चुलीतील विस्तवावर पडल्याने भडका उडाला. त्यामुळे त्यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. त्यात त्या ८० टक्के भाजल्या. नातेवाइकांनी त्यांना तातडीने कळंबणी खेड येथील रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी तिला कोल्हापूर येथे दाखल केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 22-01-2025

Gadre1