खेड : एसटी बस-बोलेरो पिकअप गाडीचा अपघात

खेड : तालुक्यातील मौजे कशेडी गावी गवाणकरवाडी फाट्याजवळ दि. १४ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता एसटी बस आणि बोलेरो पिकअप गाडी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांना मोठे नुकसान झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा ते मुंबई जाणारी एसटी बस मौजे कशेडी गवाणकरवाडी फाट्याजवळ वळण घेण्यासाठी इशारा देत होती. याच दरम्यान, पाठीमागून येणारी बोलेरो पिकअप गाडीने एसटी बसला उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिकअप गाडीने एसटी बसच्या उजव्या बाजूला असलेल्या एमर्जन्सी दरवाजाजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांना मोठे नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणी बोलेरो पिकअप गाडीचा चालक यासीन हैदर अली कुरेशी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या मते, आरोपी चालकाला एसटी बसने वळण घेण्यासाठी इशारा दिला होता, तरीही तो बेदरकारपणे भरधाव वेगाने गाडी चालवत होता. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक खंडित झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 22/Jan/2025