खेड : लोटे एमआयडीसीतील कंपनीच्या प्रवेशद्वारावर दुचाकीची चोरी

खेड : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथे दुचाकी चोरीची घटना घडली आहे. ए.बी. मोरी कंपनीच्या गेट नं. ३ च्या समोर उभी असलेली एक दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल विश्वनाथ पंडे यांनी आपली बजाज पल्सर मोटरसायकल दि. १४ जानेवारी रोजी रात्री उशीरा ए. बी. मोरी कंपनीच्या गेट नं. ३ च्या समोर उभी केली होती. मात्र, सकाळी उठून पाहिल्यास मोटरसायकल तिथे नव्हती. याबाबत पंडे यांनी तत्काळ खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या मते, चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात ही चोरी केली असावी. सध्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 22/Jan/2025