चिपळुणात विविध ठिकाणी माघी गणेशोत्सव

चिपळूण : चिपळूण शहर परिसरात दि. ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत विविध ठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मळ्यातील स्वयंभू गणेश मंदिर, उक्ताड येथील स्वयंभू गणेश, मुरादपूर मळ्यातील स्वयंभू गणेश मंदिर, पेठमाप गणेश मंदिर तसेच राऊत आळी येथील गणेश मंदिर आदी मंदिरांसह काविळतळी येथे आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनी आदींच्या माध्यमातून उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

काविळतळी येथील आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनीतर्फे दि. ३० जानेवारी रोजी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. यामध्ये रत्नागिरी श्री, रत्नागिरी मास्टर, रत्नागिरी ज्युनियर, रत्नागिरी मॅन फिजिक्स या गटात स्पर्धा होणार आहेत. दि. ३१ रोजी गणेशमूर्ती आगमन सोहळा व मिरवणूक, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वा. मूर्तीची स्थापना, काकड आरती, जप, सकाळी ८ ते ९ वा. दुर्वाशनी पत्रांचे सहस्त्रनाम, सकाळी १० वा. जन्म पूजा, ११ ते १ या वेळेत निरबाडे येथील हभप श्रावणी शैलेश सुतार यांचे जन्मोत्सव कीर्तन, ६ ते ७:३० या वेळेत हरिपाठ, धुपारती. रात्री ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दि. २ फेब्रुवारी रोजी काकडा आरती, जप, सकाळी ७ ते ९ वा. गणेश गायत्री मंत्र, सत्यनारायण महापूजा, सायंकाळी हळदी-कुंकू, तीर्थप्रसाद. रात्री ८ वा. शाहीर शाहीद खेरटकर (शक्तीवाले) व शाहीर एकनाथ डिके (तुरेवाले) यांच्यात शक्ती-तुराचा सामना होईल. दि. ३ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आरोग्य शिबिर, अभिषेक, सायंकाळी ४ वा. विसर्जन मिरवणुकीने जन्मोत्सवाची सांगता होईल.

राऊतआळी गणेश मंदिरात दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ६ ते ७ या वेळेत भक्तीगीते व सनई-चौघडा वादन, श्रींची पूजा, अथर्वशीर्ष व आरती. सायं. ७ वा. मालघर येथील विठ्ठल-रखुमाई भजन मंडळाचे भजन, दि. ३१ रोजी रात्री ९ वा. खेर्डी हनुमानवाडी येथील मंडळाचे भजन. दि. १ फेब्रुवारी रोजी दापोली येथील हभप विनायक आगरकर यांचे नारदीय कीर्तन, दुपारी सत्यनारायण पूजा, रात्री ९.३० वा. संजय कळमकर यांचे ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ विषयावर व्याख्यान. दि. २ फेब्रुवारी रोजी आरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होतील. शहरातील अन्य गणेश मंदिरांमध्येही दररोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 22/Jan/2025