टिळक आळी शताब्दी गणेशोत्सवानिमित्त रविवारी ‘संगीत बावनखणी’ नाटकाचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरीतील टिळक आळी गणेशोत्सव मंडळ शताब्दी महोत्सवात दर महिन्याला सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ १० वाजता टिळक आळी गणेशोत्सव मंडळ मंडप येथे परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) निर्मित, कै. विद्याधर गोखले लिखित ‘संगीत बावनखणी’ नाटकाचे आयोजन केले आहे.

परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे ही संस्था आधुनिक काळातही संगीत नाटक टिकून रहावे हासाठी कार्य करीत आहे. या संस्थेने अनेक संगीत नाटकांची निर्मिती केली असून राज्य संगीत नाट्य स्पर्धेत तसेच अन्य स्पर्धांतून विविध पारितोषिके प्राप्त केली आहेत. तरी या नाट्यप्रयोगाला रसिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 23/Jan/2025