गोवंश तस्करीप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार : आ. शेखर निकम

चिपळूण : कुंभार्ली घाटातील गुरे तस्करीप्रकरणी सर्वांवर कठोर कारवाई करा, तस्करीचे रैकेट मूळापासून उखडून टाका, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आमदार शेखर निकम यांनी बुधवारी स्वानिकांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बाबत लवकरच आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोवंश तस्करीची पाळेमुळे खणून काढा, अशी मागणी
चिपळूणचे आ. शेखर निकमही करणार असल्याचे आ. निकम यांनी सांगितले.

मंगळवारी रात्री चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात गुरे तस्करीचे प्रकरण उघडकीस आले. यानंतर आमदार निक्रम हे आक्रमक झाले. बुधवारी सकाळपासूनच त्यांनी या प्रकरणी जे कुणी दोषी असतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडे चर्चा केली. जिल्हा पोलिस अधिक्षकांशीही चर्चा केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. मुळातच गुरे तस्करी ही गंभीर बाब असून त्याची पाळेमुळे खोलवर रूजलेली आहेत. त्यामुळे ती मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी अशा प्रकरणात गुरे देणारे आणि ते घेणारे अशा सर्वांवर कठोर कारवाई होईल, यादृष्टीने आवश्यक ती पावले उचलावलीत. गुरे तस्करीचा बिमोड करण्याच्यादृष्टीने आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे आमदार निकम यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 23/Jan/2025