रत्नागिरीत शनिवारी सुजन पालकत्व कार्यशाळा

रत्नागिरी : प्रयोग केंद्र लोणावळा प्रेरित स्थानिक रत्नागिरी केंद्र आयोजित सुजन पालकत्व कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालय पर्याची आळी, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये समृद्ध आणि प्रभावी पालकत्वाच्या युक्त्या, मोबाईल आणि गेम्सपासून मुलांना परावृत्त कसे करावे, पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या क्षमता यांचा मेळ, पाल्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा, आनंदी मुले आणि आनंदी पालकत्वाची दिशा आदी बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मुलांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक क्षमता वाढीचा हा काळ. वर्तनातले बदलही या कालावधीत होत असतात. या मुलांना एका बाजूने आई-वडिलांच्या अपेक्षांचे ताण असतात. दुसऱ्या बाजूने स्पर्धेच्या युगात टिकायचे असते. तिसऱ्या बाजूने आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवणूक करून घ्यायची असते. उमलण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या या मुलांना कसे समजावून घ्यायचे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर स्वभाव व आरोग्य यांमध्ये समतोल कसा आणायचा, या बाबतचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 23/Jan/2025