श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे ३० जानेवारी पासून माघी गणेशोत्सव

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानतर्फे गुरुवारी (ता. ३०) जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी ९.३० ते ११.३० या वेळी श्रींची महापूजा व प्रसाद, ४ ते ७ या वेळेत गणेशयाग स्थापना, ३० जानेवारी आणि २ फेब्रुवारीला सायंकाळी सामुदायिक आरती व मंत्रपुष्प. ३१ला सकाळी सात वाजता कलशारोहण वर्धापनदिनानिमित्त गणेशयाग पूर्णाहुती. १ फेब्रुवारीला सायंकाळी ४ ते ६ वाजता श्रींची पालखी मिरवणूक (प्रदक्षिणा) माघी यात्रेला सुरुवात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 23/Jan/2025