रत्नागिरी : सलग दुसऱ्या वर्षी ‘भंडारी प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

◼️ २७ फेब्रुवारीला उद्घाटन; लिलाव प्रक्रियेद्वारे खेळाडूंवर लागणार बोली

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथे सलग दुसऱ्या वर्षी ‘ भंडारी प्रीमियर लीग ‘ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड येथील कै. नाना साहेब मयेकर क्रीडांगणावर ही भव्यदिव्य स्पर्धा भरवण्यात येणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर प्रत्येक खेळाडूवर बोली लावून बारा संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याची माहिती आयोजक निखिल बोरकर यांनी दिली.

भंडारी समाजातील तरुणांना क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळावी तसेच भंडारी समाजातील तरुण वर्ग या भंडारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एकवटला जावा ही उद्दिष्ट नजरे समोर ठेऊन ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ रत्नागिरी आणि गुहागर तालुका मर्यादित ठेवण्यात आली आहे.

भंडारी प्रीमियर लीगसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत विजेत्या संघाला ५१ हजार रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला ३५ हजार रोख व चषक, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक २५ हजार रोख व चषक, चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ११ हजार रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूला देखील गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी निखिल बोरकर 9422750907 आणि पंकज नार्वेकर 8668699844 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 23-01-2025