मंडणगड : गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकताच रस्ता सुरक्षाबाबत मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’ जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी व उपनिरीक्षक सत्यवंत पाटील हे उपस्थित होते. अध्यक्षस्थनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते.

यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, डॉ. शैलेश भैसारे, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. अशोक कठांळे, प्रा. महादेव वाघ, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, वाहन चालक हरी बनसोडे, पेठे मोटार ट्रेनिंग स्कूलचे अधिकृत ट्रेनर हनुमंत भागवत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. संगीता घाडगे यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. उपनिरीक्षक सत्यवंत पाटील, वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 23/Jan/2025