संगमेश्वर : शिर्केवाडी-भवानगड रस्त्याचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी भवानगड येथे भाविकांना पायीच प्रवास करावा लागत असे. भवानगड हे ऐतिहासिक ठिकाण असून तेथे भवानी आईचे पुरातन मंदिर आहे. मात्र, खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांना मंदिरात जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांनी या समस्येकडे लक्ष वेधून रस्ता करण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत आमदार शेखर निकम यांनी हा रस्ता ‘क’ वर्ग पर्यटन योजनेंतर्गत मंजूर केला.

यामुळे आता भवानगडवर जाणे भाविकांसाठी अधिक सोयीचे होणार आहे आणि भवानी आईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आमदार शेखर निकम यांच्याहस्ते व ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकत्यांच्या उपस्थितीत उत्साहात संगमेश्वर शिर्केवाडी भवानगड रस्ता कामाचे उद्घाटन करताना याप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात भवानगड परिसराचा सर्वांगिण विकास करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमानंतर आमदार शेखर निकम यांनी भवानगड यात्रौत्सवात सहभागी होऊन भवानी आईचे दर्शन घेतले आणि ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधला.

यावेळी माजी जि.प. सभापती राजन कापडी, र.जि.म. बैंक संचालक राजेंद्र सुर्वे, सरपंच अस्मिता देवरुखकर, उपसरपंच अमित शिर्के, माजी सरपंच संतोष भडवलकर, मोहन ओकटे, अविनाश गुरव, संतोष जाधव, रमेश शिर्के, महेश पुरी, प्रदीप शिर्के, सुमित्रा मांजरेकर, पोलीस पाटील विलास राऊत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 23/Jan/2025