Breaking : उबाठा ला रामराम करीत उद्या होणार शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम

रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला रामराम करीत उद्या शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रत्नागिरी येथील हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये हा भव्यप्रवेशाचा कार्यक्रम उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या प्रवेशाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. उबाठा चे माजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या समवेत शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 23-01-2025

Shanti real estate 1