देवरुख : शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागामार्फत ‘टिच कार्निव्हल २ के २५’ हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने पटकावले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, आयक्यूएसी समन्वयक प्रताप नाईकवाडे या सर्वांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विभाग प्रमुख पूनम भोपळकर जाधव यांनी या कार्यक्रमाची सर्व उपस्थितांना माहिती दिली. महाविद्यालयाचे संस्था उपाध्यक्ष, प्राचार्य यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांतर्गत कॉडील्ट, क्वीझस्टर, वेब डेव्हलपमेंट, पीपीटी प्रेझेंटेशन, फोटोग्राफी आणि ई स्पोर्ट्स अशा सहा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र, चषक व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. यावर्षीचे सर्वसाधारण जेतेपद गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांनी पटकावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 23/Jan/2025














