रत्नागिरी : भाट्येत मोफत आरोग्य तपासणी शिबिर

रत्नागिरी : भाट्ये येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. आयुर्तत्त्व क्लिनिक, शांतादुर्गा क्लिनिक व स्नेहदीप पॅथॉलॉजी लॅबने याचे नियोजन केले. लहान मुले, महिला आणि पुरुषांच्या विविध आरोग्यविषयक शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. ७० ग्रामस्थांनी मोफत तपासणी करून घेतली. प्रत्येक महिन्यात आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी देखील सर्वांनी बहुसंख्येने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पूजा माने व डॉ. प्रज्ञा जाखी यांनी केले. आरोग्य शिबिराला भाट्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीती भाटकर तसेच रमिजा भाटकर, प्रियंका नार्वेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 23/Jan/2025

Radhakrushna patapedhi