रत्नागिरी : भंडारी समाज संघाच्या उपोषणाला भारतीय मजदूर संघाचा पाठिंबा

रत्नागिरी : दानशूर भागोजीशेठ कीर यांचा इतिहास जाणीवपूर्वक पुसण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक दिनी भंडारी समाज व इतर समाज संघटनांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.

त्यानिमित्ताने पतितपावन मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला भारतीय मजदूर संघासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

शहरातील पतितपावन मंदिर दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधल्याचा पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलून आठवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचा इतिहास शिकवला जात आहे. या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. परंतु, अजूनही शासनाकडून कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. त्याचा निषेध म्हणून उपोषण करण्यात येणार आहे.

यावेळी भारतीय मजदूर संघाच्या संघटनमंत्री संजना वाडकर यांनी भागोजी शेठ कीर यांचे देदीप्यमान कार्य पुसले जाऊ नये म्हणून या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आणि हे कोणत्या एका व्यक्तीचे किंवा एका समाजाचे काम नसून संपूर्ण मानवजातीचे काम आहे. त्यामुळे सर्वांनी या उपोषणामध्ये भाग घेऊन सरकारला तात्काळ चूक सुधारण्यासाठी भाग पाडावे, असे आवाहन केले.

Tata sierra

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:55 24-01-2025