संगमेश्वर : नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यार्थींचा शपथविधी उत्साहात

संगमेश्वर : नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग संगमेश्वरच्या बीएसस्सी नर्सिंगच्या पाचव्या, तर एएनएमच्या पहिल्या बॅचचा शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजित मोरे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, स्मिता सावर्डेकर, महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रज्ञा कदम आदी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी २०२४-२५ बॅचच्या विद्यार्थ्यांना नर्सिंगची शपथ देण्यात आली. याप्रसंगी बोलताना चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी आपल्या कामात मोलाचे श्रेय असते. तुम्ही जे शिकता त्यामध्ये पारंगत होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. श्री. हेगशेट्ये यांनी संगमेश्वर, देवरुखच्या मदर तेरेसा म्हणजे हळबे मावशी यांच्या कार्याची व संघर्षाची ओळख करून दिली. पुढील काळात नर्स हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

डॉ. अभिजीत मोरे यांनी पालकांनी मुलांना योग्य क्षेत्र निवडू दिले या साठी त्याचे आभार मानत मुलांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपल्या वक्तव्यातून व्यक्त केल्या.

या प्रसंगी प्राचार्या डॉ. कदम यांनी नवीन बॅचला शपथ देऊन महाविद्यालय वार्षिक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालय विद्यार्थिनी भूमिका म्हादे आणि श्रुती माने यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 24/Jan/2025