मंडणगडमध्ये उद्यापासून मॅरेथॉन स्पर्धा

मंडणगड : मैत्री फाऊंडेशन व एस. एस. कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून २५ जानेवारी २०२५ रोजी मंडणगड शहरात विविध वयोगटासाठी मंडणगड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश मर्चेंडे, तहसीलदार अक्षय ढाकणे, नगरपंचायत मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, अॅड. मिलींद लोखंडे, पोलीस निरिक्षक नितीन गवारे, विजय पवार, मुंबई इंडियन टीम कॉर्डिनेटर सुमित साळवी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

स्पर्धेचे नियम, नियमावली व अधिक माहितीसाठी अभिषेक मर्चेंडे, प्रशांत मर्चेंडे, सोहम सोविलकर, प्रणव पाटील, संतोष जंगम सुमेध मर्चेंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मनोज मर्चेंडे व शंकर जंगम यांनी केले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूत सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 24/Jan/2025