रत्नागिरी : विद्यार्थ्यांना आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय मोठी ठेवा, स्वप्न मोठी बघा व ती पूर्ण करण्याकरिता प्रयत्नशील राहा, असे प्रतिपादन अंजली चोरगे यांनी केले. डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
डॉ. तानाजीराव चोरगे कनिष्ठ शास्त्र महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी संस्थेच्या संचालिका शालेय समिती अध्यक्षा अंजली चोरगे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून वीरबंदर गावच्या सरपंच श्रेया श्रीकृष्ण वीरकर व मौजे वीरवंदर ग्रामपंचायत सदस्या कळके या उपस्थित होत्या. शालेय समिती सदस्या गीता पाटील, प्राचार्य सचिन तावेकर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पंचक्रोशीतील पालवण शाळेतील अनघा तांबेकर व तुरंबव क्र. १ शाळेतील सृष्टी भुवड या दोन विद्यार्थिनींनी नासा व इस्त्रो परीक्षेत यश मिळवल्याने तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक रंगाटे व उपरे यांचा अध्यक्षांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन सलोनी भुवड हिने तर आभार प्रांजल मोरे हिने मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 24/Jan/2025














