खासदार सुनील तटकरे यांचा दापोली दौरा अचानक रद्द

दापोली : खासदार सुनील तटकरे यांचा दि. २४ जानेवारी रोजी दापोली दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात अधिकाऱ्यांकडून विकास कामांचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र, तटकरे याचा दापोली दौरा अचानक रद्द करण्यात आला असून खा. तटकरे यांनी थेट मुंबई गाठली आहे. दि २३ रोजी झालेला मंडणगड दौरा देखील तटकरे यांनी तासाभरात आटोपला होता.

सध्या रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर असल्याने अस पालकमंत्री पदाचा पेच कायम होता. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत शिंदेंच्या शिवसेनेने उडी घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना असा संघर्ष वाढला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरून मुबईत दाखल झाले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील मालेगाव येथे आले आहेत.

त्यामुळे तटकरे यांनी दापोली दौरा रद्द केला, असे बोलले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे भाजपचे नितेश राणे यांना देण्यात आले आहे तर रत्नागिरीचे उदय सामंत याना दिले आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसलाला मिळाले पाहिजे, असे कार्यकर्ते बोलत आहेत. त्यामुळे खासदार सुनील तटकरे हे या पालकमंत्री पदासंदर्भातील तिढा सोडवतील का, असा सवाल उपस्थिती होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 25/Jan/2025