पावसमधील जुगारावर पोलिसांचा छापा

पावस : पावस बाजारपेठ येथील मारुती मंदिर परिसरात मोकळ्या जागेत मटका जुगारावर पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ७९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

संशयिताविरुद्ध पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पांडुरंग बंडबे (४४) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २३) दुपारी निदर्शनास आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित विनापरवाना जुगाराचे साहित्य बाळगलेल्या स्थितीत सापडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 25-01-2025

Baguass