देवरुख शहराच्या प्रारुप विकास आराखड्याबाबत बैठक

साडवली : देवरुख शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यासाठी सहाय्यक संचालक नगर रचना रत्नागिरी तथा नगर रचना अधिकारी स्मिता कलकुटगी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये उपस्थित नागरिकांकडून पुढील वीस वर्ष देवरुखची गरज ओळखून आपले मत व सूचना जाणून घेण्यात आल्या.

या प्रारुप विकास आराखड्यामध्ये नाट्यगृह, शॉपिंग सेंटर, भाजी मंडई, अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत दोन दवाखाने, क्रीडांगण, स्विमिंग पुल, रोड वायडिंग, जॉगिंग वॉकिंग ट्रॅक, कर्मचारी वसाहत, बचत गटाच्या महिलांसाठी विक्री केंद्र, त्यांना बैठका घेण्यासाठी हॉल, ऑफिस, फेरीवाला क्षेत्र, पे अॅन्ड पार्किंगची व्यवस्था आदी गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. प्रारुप विकास आराखडा तयार करण्यासाठी नगर पंचायतीने इरादा जाहीर करावा लागतो. यावेळी ऑगस्ट २०२४ मध्ये देवरुख नगर पंचायतीच्यावतीने राज्य शासन राजपत्रामध्ये इरादा जाहीर करण्यात आला असून नगर रचना अधिकारी म्हणून सहाय्यक संचालक नगर रचना विभाग रत्नागिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगर पंचायत कार्यक्षेत्रातील भौगोलिक माहिती जीआयएस प्रणाली वापरुन व प्रत्यक्ष जागेवर जावून खात्री करुन नगररचना अधिकारी यांनी जमीन वापर नकाशा तयार केला आहे. हा नकाशा नगर पंचायत क्षेत्रातील अस्तित्वातील सुविधांसबंधीत अहवालासह नगर पंचायतकडे प्राप्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 25/Jan/2025