संगमेश्वर : कोकणात शेती होत नाही, अशी ओरड न करता शेतीपूरक व्यवसायाच्या योजनांचा लाभ येथील शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. त्याद्वारे गाई, म्हशी पालनाने दुग्ध व्यवसाय, ओला हिरवा चारा तयार करणे, कुक्कुटपालन, शेळी व्यवसाय, भाजीपाला तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सातत्य व कष्टाची तयारी ठेवा, शेतीपूरक योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी बना, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
कडवई जिल्हा परिषद गटाच्यावतीने तुरळ येथे आयोक्ति साकार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम कडवई जिल्हा परिषद गटातील कार्यकत्यांनी केला. याप्रसंगी आमदार निकम यांनी मतदार व कार्यकर्त्यांपैकी कृतज्ञता व्यक्त करून माझ्यावर ठेवलेला विश्वास हा विकासकामे करूनच सार्थ ठरवेन, असे आश्वासन दिले. याप्रसंगी आरडीसी बँक संचालक राजेंद्र सुर्वे म्हणाले सामान्य
कार्यकर्ता रात्रं-दिवस प्रचारासाठी झटला त्यामध्ये विशेष मेहनत धामापूर गटातील अनेक कार्यकर्त्यांनी घेऊन मताधिक्य मिळवून दिले. आपण सर्व एकनिष्ठ राहिलो म्हणून हा विजय झाला, असे त्यांनी सांगितले.
कडवईचे उपसरपंच दता ओकटे, तुरळाचे सरपंच सहदेव सुवरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर राजवाडी ग्रामपंचायतचे सदस्य संतोष भडवळकर व माजी सभापती कृष्णाजी होकर यांनी मनोगत व्यक्त करताना आमदारांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला.
या कार्यक्रमानिमित्त रत्नागिरी जिल्हा कबड्डी चाचणीत निवड झालेला मुचरी येथील चेतन गोसावी यांचा आमदारांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला, या कार्यक्रमासाठी राजेंद्र सर्वे, राजेंद्र पोमेडकर सुशील भायजे शशिकांत घाणेकर, तुकाराम मेस्त्री, वसंत उजगावकर, माजी सभापती कृष्णाजी होकर, डॉ. अमित ताठरे, डॉ. जुवळे, धामणीतील उद्योजक प्रभाकर घाणेकर, संजयराव कदम, राजेंद्र कदम राज बोथरे, संपूर्ण कडवई जिल्हा परिषद गटातील सरपंच, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील पाच वर्षात संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात आमदार निकम यांनी पूर्ण केली होती. त्यामुळे येथील मतदार त्यांच्या मागे उभा राहिला. त्याच पद्धतीने उर्वरित कामेही त्यांच्यापुढे मांडली जाणार आहेत – संतोष भडवळकर, ग्रामस्थ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 25/Jan/2025














