जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक जि.प. रत्नागिरी आयोजित नासा-इस्रो चाळणी परीक्षेत जि.प. पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा आगवे तर्फे फुणगूस या शाळेतील विद्यार्थी कु. वेदांत सुनिल मालप व कु. कौस्तुभ आण्णा गाटे यांनी यश संपादन केले असून दोघांचीही इस्रो अभ्यास दौरासाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थी वेदांत मालप व कौस्तुभ गाटे तसेच मार्गदर्शक उपक्रमशील शिक्षक श्री. पांडुरंग शेजाळ, सौ. संपदा कानडे, सौ, मिनल कांबळे, मुख्याध्यापक. श्री. जानू भोजे या सर्वांचे तसेच शाळा व्यवस्थापन समिती बोंड्ये केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय राणे, खालगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते पं. स. रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीम. प्रेरणा शिंदे यानी यशस्वी विद्यार्थीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खास अभिनंदन करुन कौतुक केले. ग्रामीण भागातील एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने उज्ज्वल यश संपादन केले ही बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे पालकांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 25/Jan/2025














