रत्नागिरी : सुधा पेडणेकर यांच्याकडून फाटक प्रशालेच्या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

रत्नागिरी : येथील फाटक प्रशालेच्या १९७० च्या अकरावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी निवृत्त शिक्षिका श्रीमती सुधा पेडणेकर यांनी चित्रकलेतील प्रावीण्याबद्दल शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली.

या शैक्षणिक वर्षाकरिता ही शिष्यवृत्ती रुद्र राजेश झाडगावकर आणि वरद प्रशांत मेस्त्री (दोघेही आठवी -ब) यांना प्रत्येकी ५००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

श्रीमती सुधा पेडणेकर यांचे वडील कै.रामचंद्र पेडणेकर आणि काका कै. शामराव पेडणेकर हे दोघेही फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी दोन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षीची शिष्यवृत्ती या दोन विद्यार्थ्यांना मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्षा ॲड. सौ. सुमिता भावे, सीईओ सौ. बोपर्डीकर, मुख्याध्यापक कीर, उपमुख्याध्यापक जोशी, पर्यवेक्षिका सौ. शेट्ये, संस्थेचे सचिव व शाळेचे कलाशिक्षक दिलीप भातडे , कलाशिक्षक नीलेश पावसकर , शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच श्रीमती सुधा पेडणेकर यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 31-01-2025