कोकणातून महाकुंभ मेळ्यासाठी विशेष ट्रेनची मागणी

खेड : १४४ वर्षांतून येणारी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराजसाठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून रेल्वेच्या सर्व संबंधितांकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.

१४४ वर्षांत एकदा साजरा होणारा हा महोत्सव लाखो भाविकांसाठी जीवनातील एक अद्वितीय आणि धार्मिक अनुभव ठरेल. त्यामुळे कोकणातील अनेक भक्त प्रयागराजला प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत. महाकुंभमेळ्यासाठी सावंतवाडी ते प्रयागराज दरम्यान काही विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व तालुक्यांतील नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी या गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पण व पनवेल स्थानकांवर बांबे देऊन पुढे प्रयागराजला रवाना करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 03/Feb/2025

Tata aeris