योग्य औषधोपचाराने कुष्ठरोग निर्मूलन शक्य : प्रफुल्ल केळसकर

सावर्डे : सांसर्गिक रोगापैकी कुष्ठरोग सर्वात कमी सांसर्गित आहे. कुष्ठरोग नियमित रोगापैकी एक आहे. त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नयेत. परिसरातील सर्वांना माहिती देऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी. कुष्ठरोगाची लक्षणे वेळीच जाणून घेतली व योग्य निदानासह औषध उपचार केले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो व आपण कुष्ठरोगाचे निर्मूलन करू शकतो, असे मत सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यवेक्षक प्रफुल केळसकर यांनी व्यक्त केले.

सह्याद्री शिक्षण संस्था व प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या वतीने गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी अखेर आयोजित स्पर्श अभियानांतर्गत कुष्ठरोग जनजागृतीसाठी प्रभात फेरी व कुष्ठरोग निर्मूलन व स्वच्छता शपथ आदी उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डेचे पर्यवेक्षक प्रफुल्ल केळसकर, सहाय्यक रिया जाधव, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

केळसकर यांनी कुष्ठरोगाच्या लक्षणांची सविस्तर माहिती दिली. कुष्ठरोगाविषयी असणारे गैरसमज घातक असून त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले व व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना या रोगाविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी हातभार कसा लावता येतो, त्याची माहिती दिली. प्राचार्य राजेंद्र वारे यांनी प्रास्ताविकातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानाचा उद्देश विशद केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 03/Feb/2025

Tata sierra